Home Fashion केंद्रीय कॅबिनेटकडून ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मान्यता, सूत्रांची माहिती

केंद्रीय कॅबिनेटकडून ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मान्यता, सूत्रांची माहिती

by Editor-in-Chief
0 comment
Oplus_131072

मंत्रालय टाइम्स मुंबई
रामनाथ कोविंद समितीने केंद्रीय कॅबीनेटसमोर ठेवलेल्या प्रस्तावाला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती समोर आली आह

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेला ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation one Election) या धोरणाला मान्यता दिल्याची माहिती समोर आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण कितपत व्यवहार्य आहे, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती.  या समितीने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणबाबत अनुकूल मत दर्शवत एक अहवाल सादर केला होता. या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे समजते. यानंतर आता या धोरणाला संसदेत मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र, विरोधक याबाबत काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. यावरुन तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

You may also like

Leave a Comment

About Us

Lorem ipsum dolor sit amet, consect etur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis..

Feature Posts

Newsletter

Subscribe my Newsletter for new blog posts, tips & new photos. Let's stay updated!