सागरी जलतरणात धुर्वेचा नवा विक्रम

मुंबईत: साहसी  जल तरण पटू  सुखदेव धुर्वेने गुरुवारी मुंबईतील अरबी सागरात मोरा  ते  गेट वे ऑफ इंडिया हे २२ किलोमीटर सागरी अंतर ३ तास ५३ मिनिट वेळेत पोहून पूर्ण करीत नवा विक्रम नोंदविला. धुर्वेने सकाळी ७.२२ वाजता आपल्या मोहिमेला सुरुवात केली. या साहसी जलतरण पटू ने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सकाळी ११. १५ वाजता  गेट वे ऑफ  इंडिया गाठले. या मोहिमेचे आयोजन डॉल्फिन क्लब, सामाजिक संस्था वीर बिरसा मुंडा आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या मोहिमेला राज्य जलतरण संघटना आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट ची मान्यता होती.सोमल्वर हायस्कूल रामदास पेठ शाखेचे जयंत दुबळे, स्वामीनारायण स्कूलचे सार्थक धुर्वे, मुंबईचे हिमेश आणि सेंट झेवियर स्कूल नागपूरचे काव्य चरालवार यांनी धुर्वेसोबत पेस स्वीमरची भूमिका बजावली.

Resize of DSC_4568

माजी महापौर मायाताई इवनाते, चिंतामण इवनाते, वैशाली धुर्वे, तन्वी धुर्वे, ईश्वर चरालवार, अब्दुल कामिल, सतीश मडावी (अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ), सुरज येवतीकर, पंकज वसनकर, मनोज विधाते आदींनी या मोहिमेत सुखदेव धुर्वेचे मनोधेर्य उंचावले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक प्रवीण दिक्षित यांनी धुर्वेला शुभेच्छा  दिल्या

Anil Ramteke

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *